पंजाबच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात एक धुमशान सुरु झालंय ते मतदार पुनर्रिक्षण चाचणीवरून पंजाबमध्ये ड्राफ्ट व्होटर लिस्टमधून चक्क पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचं नाव वगळण्यात आलंय.
निवडणूक आयोगानं रेकॉर्डमध्ये चड्ढा यांच्या नावाची एन्ट्री पर्मनन्टली शिफ्टेड या श्रेणीत केलेली आहे. यावरून पंजाबसह देशाच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी रंगत आहेत. तर ही केवळ तांत्रिक चूक असू शकत नाही असं मत खासदार राघव चड्ढा यांनी व्यक्त करत पंजाब सरकारनं राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई केल्याचा घणाघात केलाय.