मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील वर्सोवा येथील इन्फिनिटी मॉलमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन आणि छेडछाड झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये धाव घेत जोरदार गोंधळ घातला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप करत मनसेने मॉल व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला. तसेच संबंधित दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे काही काळ मॉल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.