दीर्घकाळ चाललेल्या गंभीर संघर्षानंतर अखेर अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपण्याची अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली आहे. या करारानंतर आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला 'होर्मुझ जलमार्ग' (Strait of Hormuz) तात्काळ वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला जाणार आहे.