अमेरिकेने मंगळवारी रात्री आणि बुधवारीही इराणवर हल्ले सुरुच ठेवले.अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तब्बल 7 तास इरावर हल्ला करण्यात आला.. यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणची क्षेपणास्त्र व ड्रोन केंद्रे, नौदलाची मालमत्ता आणि किनारपट्टीवरील संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले.त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठ्या हल्ल्याचा इशारा दिलाय.तेहरानने करारासाठी पुढाकार घेतला नाही, तर पुढील आठवड्यात वीज प्रकल्प आणि पुलांनाही लक्ष्य केले जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिलीय. दरम्यान ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.इराणविरुद्ध लष्करी कारवाई आणखी तीव्र करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. तर पुढील तीन दिवसांत इराणवर अधिक महत्त्वपूर्ण हल्ल्याचे संकेतही ट्रम्प यांनी दिलेत.