अमेरिका सध्या चांगलीच सतर्क झाली आहे. इराणसह वाटाघाटी अपेक्षेप्रमाणे पुढे गेलेल्या नाहीत. अशात इस्रायलवरचा कथित दहशतवादी हल्ला नुकताच टळला. शिवाय गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेची लढाऊ विमानं जिथून उड्डाण घेत होती, त्या इंग्लिश तळाला संभाव्य दहशतवादी धोका पाहता अमेरिकेनं आपली सगळी बाँबर विमानं तिथून हलवली आहेत. आणि ती थेट मायदेशी आणून उभी करण्यात आली आहेत.
ब्रिटनमधील फेअरफोर्ड एअरबेसवरून इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकन विमानं उड्डाण घेत होते. आता अमेरिकेनं आपली सर्व B-1 बॉम्बर विमाने परत बोलावली आहेत. येथे तब्बल 12 B-1 बॉम्बर तैनात होते. पेंटागॉनने रविवारी याची पुष्टी केली. अलीकडेच या एअरबेसची सुरक्षा वाढवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच दहशतवादी कटाच्या संशयावरून येथून पाच जणांना अटक करण्यात आली होती.
मात्र नंतर सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच ही विमानं मायदेशी आणण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.