पैसे वाटपासाठी स्पायकॅम पेनचा वापर, Supriya Sule यांचा गंभीर आरोप; Devendra Fadnavis काय म्हणाले?
Use of a spy-cam pen for distributing money—a serious allegation by Supriya Sule; what did Devendra Fadnavis say?
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.