व्हॅलेंटाईन डे निमित्त जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील गुलाबाच्या फुलांना राज्यासह परराज्यात मोठी मागणी असते.असून शिरसोली येथील गुलाबाची फुले ही अनेकांच्या प्रेमाची साक्ष ठरत आहे. शिरसोली येथील शेतकरी सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने गुलाबाच्या फुलांची लागवड करतात.या फुलांना व्हॅलेंटाईन डे निमित्त मोठी पसंती असते.व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.