विधानपरिषदेत आज क्रिप्टो-ख्रिश्चन संबंधित लक्षवेधी मांडली जाणार आहे.महाराष्ट्रात असे अनेक क्रिप्टो-ख्रिश्चन आहेत जे मूळ हिंदू किंवा इतर अनुसूचित जाती-जमातीचे असतात.पण गुप्तपणे या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला आहे. या धर्माच्या प्रथा ते गुप्तपणे पाळतात.अंत्यविधीवेळी या लोकांचा खरा धर्म दिसून येतो. हे लोकं आरक्षित जात प्रवर्गाची कागदपत्र वापरून शिक्षणात, नोकरीत, निवडणुकीत लाभ घेतात. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहतात.यासंदर्भातच ही लक्षवेधी मांडली जाणारेय.