पु्ण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. पार्थ पवारांना पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याचं समोर आलाय. या प्रकरणी DGP सदानंद दाते यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी दत्तात्रय वाघमारे यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केलंय. पार्थ पवार यांचा आर्थिक सहभाग, सही, कॉल रेकॉर्ड किंवा बैठकांचा कोणताही पुरावा मिळाला नाही.त्यामुळे LLP कायद्यानुसार त्यांना अप्रत्यक्षपणे आरोपी करता येणार नसल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. 99% हिस्सेदारी असलेली व्यक्ती जबाबदार नाही आणि १% असलेली व्यक्ती आरोपी आहे, हे कसे?" असा सवाल न्या. माधव जामदार यांनी सरकारला केला होता. यावर तपास अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिलीय. दरम्यान या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केलीय.. याबाबत त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी..