Vilas Ghule हत्या प्रकरणावरून Beed मध्ये 21 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे याला अटक करण्याच्या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवांची व्यापक बैठक पार पडली असून सरकारला तीव्र इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांचे बारा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ