विरार पूर्वेतील गावडवाडी परिसरात वसई–विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील चालत्या बसचा टायर निखळला. प्रवाशांनी भरलेल्या या बसचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. विरार पूर्वेला गावडवाडी परिसरात उड्डाण पुलाखाली रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास चालत्या बसचे चाक अचानक निखळलं त्यामुळे मोठा आवाज झाला आणि बस रस्त्यावर झुकली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बसमधून खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. वसई–विरार महानगरपालिका परिवहन विभागाच्या बसेस जुन्या आणि जर्जर झाल्या असून, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं करणार आहे.