पालम विमानतळावर स्वागतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन हे एकाच कारमधून निघाले. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये पुतीन यांच्या दौऱ्यात महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय.. दोन्ही देशांचे प्रमुख नेते ज्या कारमधून विमानतळावरुन बाहेर पडले ती कार देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील पासिंगची आहे. कारचा क्रमांक MH-01-EN-5795 आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र पासिंगच्या फॉर्च्यूनर कारमधून दोन्ही नेत्यांनी प्रवास केला. यामुळे पुतीन यांच्या दौऱ्यासोबत मुंबईचीही चर्चा झालीय..