रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी अखेर दाखल झालेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं.. पुतिन 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.. पुतिन 30 तास भारतात राहणार आहेत.. मोदींसोबत वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशात विविध करार होणार आहेत. या दोन्ही देशात आता कोणते करार होतात याची उत्सुकता सर्वांना लागलीय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवले आणि पालम विमानतळावर जाऊन स्वतः पुतिन यांचे सहर्ष स्वागत केले. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये भगवद्गीतेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे