Vladimir Putin यांच्याकडून नाटोला इशारा; नाटो देशांनी रशियावर हल्ला केल्यास प्रत्युत्तर |Global News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी NATO देशांना अणुहल्ल्याची धमकी दिली.रशियाच्या कोणत्याही भूभागावर हल्ला झाल्यास रशिया आपल्या सर्व शस्त्रांनी प्रत्युत्तर देईल. मॉस्को इथं वाल्दाई फोरममध्ये ते बोलत होते. नाटोनं रशियाचा महत्त्वाचा भाग कॅलिनिनग्रादला रशियापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर रशिया त्यावर अणुबाँबनंही प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा पुतिन यांनी दिलीय. कॅलिनिनग्राड हा रशियाचा एक स्वतंत्र भूभाग आहे. तो रशियाच्या उर्वरित भागाशी जोडलेला नाही. रशियाच्या सीमारेषेपासून ३०० किमी अंतरावर, युरोपमध्ये पोलंड आणि लिथुआनियादरम्यान तो येतो. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४५ पासून या भागावर रशियाचा ताबा आहे.

संबंधित व्हिडीओ