मुंबईतील वडाळा परिसरात असलेल्या बेस्टच्या आणिक आगारात आज भीषण आग लागल्याची घटना घडली. पार्क करून ठेवलेल्या बसला आग लागल्यानंतर आगीने वेगाने रौद्ररूप धारण केलं.. या आगीत बेस्टच्या 11 सीएनजी बस जळाल्याची माहिती समोर आलीय. अग्निशमन दलाने आग विझवण्यात यश मिळवलं असलं तरी बसचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावेळी ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं.