Waqf Amendment Bill| नवीन वक्फ कायद्याबाबत मोठी बातमी, केंद्र सरकारने सात दिवसात उत्तर द्यावं-कोर्ट

नव्या वक्फ कायद्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारने सात दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत. तोपर्यंत केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याबाबत जैसे थे परिस्थितीच कायम ठेवावी असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात 70 हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या त्यावर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी तुर्तास वक्फशी संबंधित जमिनीच्या कोणत्याही वादावर कोर्ट सुनावणी करणार नसल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय.. आता या प्रकरणी 5 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे..वक्फ बोर्ड सुधारित कायद्याच्या विरोधात विरोधी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

संबंधित व्हिडीओ