महिला आयोगाच्या आज झालेल्या याच बैठकीमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रुपाली चाकणकरांना खडे बोल सुनावलेत. चाकणकर यांनी आजच्या महिला आयोग संदर्भात विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सोशल मीडिया ट्रोल वरून नाराजी व्यक्त केली त्यावर आदिती तटकरे यांनी चाकणकरांना टोला लगावल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.