Ajit Pawar यांचा अपघात की घातपात? Rohit Pawar यांनी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट केले? NDTV

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा घातपातच आहे असा दावा रोहित पवार यांनी केलाय.रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत नेत्यांना विमानसेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीच्या सुरक्षेवर आणि डीजीसीएच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्न उपस्थित केलेत.युरोपमध्ये बंदी असलेली कंपनी भारतात कशी चालते? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.या विमान कंपनीत डीजीसीएचे माजी अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचे तपास अहवाल खोटे असू शकतात, असा खळबळजनक संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. तर पूर्व विदर्भातील नेत्यामुळे 27 जानेवारीला अजित पवारांना बारामतीसाठी निघायला उशीर झाला आणि त्यामुळेच अजित पवारांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जाण्याचा निर्णय घेतलाय.असाही गौप्यस्फोट रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलाय.

संबंधित व्हिडीओ