वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस बसायला सुरुवात झालीये.. जिल्ह्यातील 70 टक्क्यापेक्षा अधिक पिकं आधीच करपून गेलेली असल्यानं उर्वरित केवळ 30 टक्के पिकांनाच या पावसाचा फायदा होणार आहे. त्यातही सोयाबीन पिकाची दाणे भरण्याची अवस्था निघून गेल्यानं उत्पन्नात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यातील कारंजा,मानोरा, मंगरुळपीर, वाशिम, मालेगाव या तालुक्यात तब्बल ४० ते ४५ दिवसानंतर पाऊस बरसला तर रिसोड तालुक्यात २५ दिवसानंतर पाऊस सुरू झालाय.