वाशिममध्ये हायकोर्टच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. पहिल्या सत्रात ६०, तर दुसऱ्या सत्रात ६० विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. मात्र, परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर स्लो होणे, की-बोर्ड नादुरुस्त असणे आणि स्क्रीनचा आकार लहान असल्याने अडचणी आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक सोयी-सुविधांचाही अभाव असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत..