BDD च्या नव्या इमारतीत पाण्याचा तुटवडा; नागरिकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा; चाळवासियांसोबत बातचीत

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या नवीन इमारतींमध्ये अनेक कुटुंबे मोठ्या स्वप्नांनी आली. मात्र त्यांना रोजच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पुनर्विकासाच्या वेळी २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ताबा मिळाल्यानंतर रहिवाशांच्या नळांना कोरडी हवा येत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले जात आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर यावर ठोस उपाययोजना केली नाही, तर बीडीडी चाळवासीय रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आलाय. बीडीडीतील चाळवासियांसोबत बातचित केलीय आमच्या प्रतिनिधींनी

संबंधित व्हिडीओ