एकीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय तर हिंगोलीच्या लक्ष्मण नाईक तांडा इथल्या नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावात असलेला एकमेव जुन्या विहिरीने सुद्धा तळ गाठला. प्रशासनानं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.