शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे अमरावतीमध्ये पोहोचलेत. यावेळी राणा दाम्पत्यानं एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं. यावेळी संवाद साधताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना नवनीत राणा, रवी राणा जेलमध्ये गेले पण घाबरले नाहीत त्याचं प्रमाणे 2022 मध्ये न घाबरता सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणल्याचा एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.