विधान परिषदेत बोलत असताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेतील सभागृहातील त्यांच्या बाकाखाली लावलेल्या काळ्या बॉक्स संदर्भात मिश्किल टोला लगावला. सभागृहातील आमच्या बाकाखाली काळा बॉक्स कशासाठी? या वायफायचा काहीही फायदा मिळत नसल्याचे सांगत, आमच्या मोबाईलमधून डेटा तिकडे जात नाहीये ना? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. सभागृहात सर्वच आमदारांच्या बाकाखाली हे वायफाय राऊटर लावण्यात आले असून, त्याच्या उपयोगाबाबत आणि संभाव्य डेटा सुरक्षिततेबाबत परब यांनी चिंता व्यक्त केली.