Weather Update| राज्यात थंडीचा जोर कमी राहणार ? नोव्हेंबरमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार

राज्यातील नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आणखी वाढू शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही, विशेषतः मराठवाडा वगळता उर्वरित भागात थंडीचा प्रभाव तुलनेने कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासह लगतच्या भागांसाठी काहीसा दिलासादायक अंदाज असून, या भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संबंधित व्हिडीओ