Weather Update| राज्यात कुठे पाऊस? कुठे उन्हाचा कडाका? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स NDTV मराठीवर

राज्यात सध्या ऑक्टोबर हीटचा जोरदार तडाखा जाणवतोय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 36 अंशांच्या पुढे गेलाय. आजही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहणार आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येलो अलर्ट देण्यात आलाय. तर दुसरीकडे राज्यात वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिवमध्येही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाची शक्यता कायम आहे. कोकण किनारपट्टीला ऑक्टोबर हीटचा जोरदार तडाखा बसतोय. राजस्थानकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव वाढलाय. त्यामुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याचं सांगितलं जातंय. कोकणात उष्णतेचा दाह अधिक जाणवतोय. रत्नागिरी आणि सांताक्रूझमध्ये बुधवारी सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आलं. गुरुवारी उष्ण हवामानाचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे पुढील तीन दिवस राज्याच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ