नवी मुंबईच्या घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने कांदा, आले, मटार, तोतापुरी कैरीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक कमी झाल्याने सध्या बाजारात फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी.