आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील अमलापूरम परिसरात चक्रीवादळ 'अर्नब' मुळे हवामानात मोठा बदल झालाय. अमलापूरममध्ये अतिवेगवान वारे वाहत असून मुसळधार पाऊस सुरू आहे.वादळाच्या प्रभावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याची आणि वीजपुरवठा खंडित झाल्याचं पहायला मिळतंय. सध्या वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किलोमीटर असून.. अनेक भागात अलर्ट जारी करण्यात आलाय.अर्णब चक्रीवादळ हे आज भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती धडकले आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला काही परिणाम होणार नाही आहे पण विदर्भातील गडचिरोली येथे या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात पाऊस पडू शकतो असा IMD च्या सुषमा नायर यांनी सांगितले आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे NDTV मराठीचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी.
What impact will Cyclone Arnab have on Maharashtra? What information did weather expert Sushma Nair provide?