पाकिस्तान मधून दहशतवादी तळ उध्वस्त झाल्याची दृश्य सकाळी समोर आली. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. या संपूर्ण मिशन ची माहिती भारतीय लष्कराच्या दोन महिलांनी दिली विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या ऑपरेशन सिंदूरची माहिती आणि पाकिस्तानात दहशतवाद्यांना कसं ठेचलं याची माहिती अवघ्या जगाला दिली.