शुक्रवारी मुंबईहून नागपूर जात असताना उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानात होते.त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात होते.आता उद्धव ठाकरे यांनी स्वत: उत्तर दिले आहे.आज उद्धव ठाकरे हे परभणी दौऱ्यावर आहेत,,,. या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला... त्यावेळी त्यांना या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली असा प्रश्न विचारण्यात आला... त्यावर त्यांनी, नेमकी काय चर्चा झाली ही येत्या काळात कळेल असे त्यांनी म्हटले आहे... उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर येत्या काळात राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार असल्याचे म्हटले जात आहे.