बदलापूर आणि पालघरच्या डहाणूतही नगर परिषद निवडणुकीवेळी मोठा राडा झालाय. डहाणूत मतदान केंद्राबाहेरच महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. तर दुसरीकडे बदलापुरातही शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आलेत. भाजप उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला मारहाण झाली, त्यानंतर या वादाला तोंड फुटलं... दोन्ही ठिकाणी नेमकं काय घडलं, पाहूया