पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे पुण्याचे पालकमंत्री म्हणतात पुण्यातली कोयता गँग, गुन्हेगारी संपली पाहिजे ण त्याचवेळी ते गुन्हेगारांना तिकीट देतात, हे अजित पवारांच्या कुठल्या तत्वात बसतं असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना विचारलाय. यालाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर टीका केलीय. एकाला परदेशात पळून जायला कुणी मदत केली? असं म्हणत निलेश घायवळवरुन अजित पवारांनी भाजप नेत्यांना सवाल विचारलाय.