कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची 'महादेवी' (माधुरी) हत्तीण गुजरातमधील 'वनतारा' केंद्रात हलवल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर आता एक सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे, ज्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'वनतारा'चे कौतुक केले आहे.