राज्याची आर्थिक आघाडीवर घसरगुंडी झाल्याचं समोर आलंय.पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेपाठोपाठ ‘निती’ आयोगाच्या अहवालातही आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.राज्यांच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेलाय.आता यावरुनही राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.