नितीन गडकरींच्या संकल्पनेतून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे २००२ मध्ये अस्तित्वात आला.तेव्हापासून मुंबईकर आणि पुणेकरांचा प्रवास सुसाट झाला.पुणंच काय कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरलाही एक्सप्रेसवेवरुनं वेगानं पोहोचणं शक्य झालं. मात्र या प्रवासामध्ये एक अदृश्य असा धोका आहे.आणि तो धोका आहे चक्क कॅन्सरचा यासंदर्भात IIT मुंबईच्या संशोधकांनी एक अभ्यास केलाय.आणि या संशोधनातून धक्कादायक बाब उघड झालीय.IIT मुंबईच्या संशोधकांनी एक्स्प्रेस वेवरच्या कामशेत बोगद्याजवळच्या हवेचे नमुने घेतले.या हवेत PAHs रसायनं सापडली.PAHs म्हणजे पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स या धोकादायक केमिकल्सचं मूळ कारण म्हणजे डिझेल वाहनं आणि याच धोकादायक PAHs मुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका असतो.फक्त फुफ्फुसांचा कर्करोगच नव्हे तर हृदयालाही ही रसायनं घातक आहेत.