केरळच्या कुट्टनाड परिसरात एका हत्तीने लोकांवर अचानक हल्ला केलाय आणि या हल्ल्यात हत्तीनं एकाला पायाखाली चिरडलाय. यात एकाचा मृत्यू झालाय. कुटनाड मधील एका मंदिरात वार्षिक उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल रात्री हत्ती अचानक पिसायला आणि त्यानं एकाला पायाखाली चिरडलं. यावेळी मंदिर परिसरातील दुकानं आणि वाहनांचंही हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय.