आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विधान परिषदेत निरोप समारंभ झाला. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपाचे माजी आमदार राम सातपुते हे मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेले दिसून आलेत.. मोहिते पाटील कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या सुमित्रा पतसंस्थेने बुडवलेल्या ठेवी , शेतकऱ्यांच्या सातबारावर चढवलेले बोजे याबाबत पतसंस्थेची एसआयटी चौकशी व्हावी. अशी थेट मागणी राम सातपुते यांनी एका एक्स पोस्टच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांचा विधिमंडळातील निरोप समारंभ झाल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात भाजप आक्रमक होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील कुटुंब राष्ट्रवादी शरद पवार गटात होते. मात्र केवळ आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपने दिलेल्या विधानपरिषद सदस्यत्वाच्या कारणाने अलिप्त दिसून आले. यामध्ये जाता रणजीत सिंह मोहिते पाटील यांचा निरोप समारंभ झाल्याने भाजप आता थेट मोहिते पाटील यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.