सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलिस प्रमुख तुषार दोशी यांची सांगली जिल्ह्यात तडकाफडकी बदली झाली.. मात्र बदली झालेच्या दिवशीच तुषार दोशींनी सातारा जिल्ह्यातील सहा ते सात पोलिस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या नियमबाह्य बदल्याबाबत सातारा जिल्हा शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. तर राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार देखील दाखल केली आहे. तसेच या बदल्याच्या चौकशीची मागणी शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.