इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन इरादा जगासमोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणमधून समृद्ध युरेनियमचा मोठा साठा बाहेर काढण्यासाठी US सैन्याला इराणमध्ये पाठवण्याच्या एका अत्यंत जोखमीच्या लष्करी मोहिमेचा विचार करत आहेत. इराणमधून युरेनियम काढायचा ट्रम्प यांचा खरंच मानस असल्यास ही मोहीम एक गुंतागुंतीची आणि जोखमीची ठरू शकते आणि तेहरानकडून याला तीव्र प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्याच्या अमेरिका आणि इस्रायलच्या प्रयत्नांमध्ये असं पाऊलं उचललं जाऊ शकतं. ट्रम्प यांच्या डोक्यातील ही योजना काय पाहूया...