किडनी स्टोनच्या उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, दोन रुग्णालयांवर वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप

मीरा-भाईंदरमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप समोर आला आहे. किडनी स्टोनच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 30 वर्षीय लक्ष्मी शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी संबंधित दोन रुग्णालये आणि डॉक्टरांच्या उपचारपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी शर्मा यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याने सुरुवातीला भाईंदर पूर्व येथील डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे सोनोग्राफी आणि किडनी स्टोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि प्रकृती गंभीर बनली. यावेळी रक्तदाब मोजण्याचे यंत्र कार्यरत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ