मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील मोर्चासाठी सोलापुरातील महिलांनी पुरुषांसाठी खास खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आहे. चिवडा, चकली, शेंगदाण्याच्या पोळ्या, कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी असे पदार्थ मोर्चेकऱ्यांसाठी बनवले जात आहेत. मराठा आरक्षणाला मिळत असलेला हा व्यापक पाठिंबा यातून दिसून येतो.