'एक्स'वर येत्या काळात मेसेजिंग, सोशल मीडिया, शॉपिंग, पेमेंट आणि व्हिडीओ कॉलिंग आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी मस्क प्रयत्नशील आहेत. यासाठी 'एक्स मनी'ची मोठी तयारी सुरू असून, पुढील महिन्यापासून याचे बीटा व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. याद्वारे यूजर्सना मनी ट्रान्सफरची सुविधा मिळेल.