Yogesh Kadam On Drought | सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, टोकाचं पाऊल उचलू नका - योगेश कदम

Yogesh Kadam On Drought | सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, टोकाचं पाऊल उचलू नका - योगेश कदम The government will not abandon farmers; do not take extreme steps Yogesh Kadam राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन करत त्यांनी दुष्काळ निवारणासाठी आगामी ८ ते ९ महिन्यांचं ठोस नियोजन सुरू असल्याचं स्पष्ट केले. एखाद्या भागात सरासरी पाऊस केवळ मोजक्या दिवसांत पडला आणि नंतरचे तीन महिने कोरडे गेले, तर तिथे दुष्काळ नाही असे म्हणता येणार नाही. त्यामुळे केवळ पावसाच्या मिलिमीटरची आकडेवारी न पाहता वस्तुस्थिती तपासून दुष्काळग्रस्त भाग निश्चित केला जात आहे.

संबंधित व्हिडीओ