Zilla Parishad Election Result 2026 | रत्नागिरीत उदय सामंत,भास्कर जाधव, योगेश कदमांची लढाई | Updates

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं. आज मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे.सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.मतमोजणी केंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून आता उद्या कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ