Zilla Parishad Election Result 2026 | Dharashiv जिल्हा परिषदेसह 8 पंचायत समित्यांचा निकाल | Updates

धाराशिव जिल्हा परिषदेसह 8 पंचायत समित्यांचा आज निकाल लागणार आहे... मतमोजणीसाठी जिल्हाभरात सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, एकूण १६०० पेक्षा अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी केंद्रांवर व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. नियोजनानुसार प्रत्येक गटाची गणना टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम आणि वाशी या तालुक्यांमध्ये क्रमाने मतमोजणी होणार असून, दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत वाजेपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील मतमोजणी कक्ष बाहेरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी

संबंधित व्हिडीओ