Zilla Parishad Election Result | रायगडमध्ये सुनील तटकरे, भरत गोगावले,महेंद्र दळवींची प्रतिष्ठा पणाला

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. राज्यात सरासरी 70 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पुणे,सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यांतील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली. त्याचं सावट जिल्हा परिषद आणि पंचयात समितीच्या निवडणुकीवर दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर आजच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ