100 वर्षांचा नवरा, 102 वर्षांची नवरी, 9 वर्षांची लव्हस्टोरी! जगावेगळ्या लग्नाचा वर्ल्ड रेकॉर्ड

100 वर्षांच्या बर्नी लिटमॅन यांनी 102 वर्षांच्या मार्जोरींसोबत लग्न केलं आहे. या दोघांचं 9 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

World oldest newlyweds: 'प्रेम आंधळं असतं' हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. एखादा व्यक्ती खऱ्या प्रेमात पडला तर तो रुप, धर्म, जाती, सामाजिक अडथळे सार काही पार करतो. या सर्व अडचणींवर मात करुन तो त्याच्या प्रिय व्यक्तीची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करतो. अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील एका जोडप्यानं सामाजिक बंधनं तोडली आहेत. ते वृद्धावस्थेत फक्त एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत तर परस्परांशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालीय.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सर्वात वयोवृद्ध जोडपे

फिलाडेल्फियामधील या जोडप्यानं सर्वात वयोवृद्ध नवविवाहीत जोडपे म्हणून त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. 100 वर्षांच्या बर्नी लिटमॅन यांनी 102 वर्षांच्या मार्जोरींसोबत लग्न केलं आहे. या दोघांचं 9 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. 

त्यांनी यावर्षी 19 डिसेंबर रोजी लग्न केलं. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी वयोवृद्ध नवविवाहित जोडपे म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवलं. या जोडप्याचं संयुक्त वय 202 आहे. या लग्नाला मार्जोरी यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांची मंडळी उपस्थित होत्या. या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी सुरु झालं तिथंच त्यांनी लग्न केलं.  

Advertisement

( नक्की वाचा :  आशिया खंडातील 'या' देशात मिळतात Rental Wife! कसा असतो करार? काय असतात अटी? )

कशी सुरु झाली लव्हस्टोरी?

100 वर्षांचे बर्नी लिटमॅन आणि 102 वर्षांच्या मार्जोरी यांची भेट एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये झाली होती. जवळपास 9 वर्षांपूर्वी एका कॉस्च्युम पार्टीमध्ये त्यांची भेट झाली होती. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काळाच्या ओघात त्यांचं परस्परांवरील प्रेम आणखी घट्ट झालं. त्यांनी आता एक पाऊल पुढं टाकत परस्परांशी लग्न केलं.

बर्नी आणि मार्जोरी दोघांनीही यापूर्वी आपआपल्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वी 6 दशकांचं वैवाहिक आयुष्य व्यतिक केलं आहे. या जोडप्याबाबतची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही दोघं तरुणपणी पेंसिल्वेनिया विद्यापीठामध्येच शिकत होते. बर्नी यांनी इंजिनिअर म्हणून काम केलंय. तर मार्जोरी शिक्षिका होत्या.  
 

Advertisement