Crime News : 'KISS कर नाहीतर गोळी मारेन', प्रसिद्ध धबधब्यावर कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं

एका कॉलेजचा विद्यार्थी आणि विद्यार्थीनी तिलैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध वृंदाहा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही गुंडांनी त्यांची छेड काढली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Koderma Brindaha Waterfall Crime News

Today Shocking News : झारखंडमधील कोडरमा (Koderma) जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका कॉलेजचा विद्यार्थी आणि विद्यार्थीनी तिलैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध वृंदाहा धबधबा (Brindaha Waterfall) पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही गुंडांनी त्यांची छेड काढली. नराधमांनी बंदुकीच्या धाकावर केवळ मारहाणच केली नाही,तर त्यांना लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडले. पीडित विद्यार्थ्याने तिलैया पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन बबलू यादव,राकेश उर्फ भखरू यादव आणि अजीत यादव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.सर्व आरोपी मोरियामाकुरा गावचे रहिवासी आहेत.गुरुवारी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान पीडित त्याच्या महिला क्लासमेटसोबत धबधबा पाहण्यासाठी गेला होता. त्याच वेळी या तिघांनी त्यांना घेरले आणि शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

व्हिडीओ व्हायरल करून पैशांची मागणी केली

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरोपींनी बंदूक काढून विद्यार्थी-विद्यार्थिनींना जीवे मारण्याची धमकी दिली. बंदुकीच्या धाकावर आरोपींनी विद्यार्थ्याला त्याच्यासोबत असलेल्या वर्गमैत्रिणीला किस करण्यास सांगितले आणि त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पैशांची मागणी केली. विद्यार्थ्याजवळ असलेले 100 रुपये हिसकावून घेतल्यानंतर त्यांनी एक QR कोड स्कॅनर दिला. भीतीपोटी विद्यार्थ्याने त्याच्या नातेवाईकाकडून पैसे मागवले. त्याने ‘दशरथ कुमार' नावाच्या स्कॅनरवर 635 रुपये ट्रान्सफर केले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत, त्यांनी फोनवर पुन्हा 5000 रुपयांची मागणी केली. 

नक्की वाचा >> Jalgaon News मित्राचा मित्रानेच काटा काढला! पोत्यात मृतदेह भरून तलावात टाकला, आरोपी गुजरातला गेले अन् नंतर..

बंदुकीच्या धाकावर विद्यार्थी-विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण फक्त जबरदस्तीने पैसे उकळणे आणि व्हिडिओ बनवण्यापुरते मर्यादित नाही.आरोपींनी बंदुकीच्या धाकावर विद्यार्थी-विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून या धक्कादायक प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. तिलैया पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू केली आहे. पोलीस मोबाईल लोकेशन आणि व्यवहाराची माहिती (स्कॅनर नाव: दशरथ कुमार) यांच्या आधारे गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

नक्की वाचा >> Video: "लग्नानंतरही पासवर्ड..", बेडरूम उघडलं नाही, नवीन घराचं बाथरूम पाहून Youtuber सौरव जोशीची पत्नी थक्क