Four Friends Funny Video : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या युगात ChatGPT, Google Gemini आणि इतर अनेक एआय टूल्स सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात राज्य करत आहेत. अनेक लोक या टूल्सच्या मदतीने वैयक्तिक ते व्यावसायिक व्हिडिओ तयार करून मोठी कमाई करत आहेत. या टूल्सद्वारे मोठ्या फाइल्स, स्क्रिप्ट आणि व्हिडिओ काही मिनिटांत तयार होतात. पण भारतात या तंत्रज्ञानाचा असा वापर होईल, हे कुणी कल्पनाही केली नसेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आधी खूप वेळ हसाल आणि मग तुमच्या तोंडून एकच वाक्य निघेल – किती भन्नाट लोक आहेत आपल्या देशात..
खरंतर,एका रूममध्ये चार मित्रांनी मॅगी बनवून खाल्ली.आता सगळ्यांमध्ये वाद झाला की भांडी कोण धुणार?या समस्येचं समाधान शोधण्यासाठी एकाने Google Gemini ची मदत घेतली आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली.शंकर नावाच्या व्यक्तीने Google Gemini ला विचारलं, “हॅलो Gemini, शंकर, अमन, अभिराम आणि अमित आम्ही चौघांनी मॅगी बनवून खाल्ली आणि आता भांडी कोण धुणार?” यावर उत्तर आलं, “भांडी तो धुणार ज्याने सर्वात आधी मॅगी खाल्ली.त्या व्यक्तीने Gemini ला विचारलं की आमच्यातील एकाचं नाव सांग, तर Gemini ने अमितचं नाव घेतलं आणि नाव ऐकताच एकच हशा पिकला.
इथे पाहा चार मित्रांचा मजेशीर व्हिडीओ
हा मजेदार व्हिडिओ पाहून लोक हसून हसून थकले आहेत. यावर एका युजरने लिहिले आहे, “अमेरिका काय म्हणत होतं, काय आहात तुम्ही, आता आम्ही विचारतो – तू काय आहेस?” दुसरा युजर लिहितो, “कसे कसे लोक राहतात आपल्या देशात.” तिसरा युजर मजेशीर अंदाजात लिहितो, “अशा कृती पाहून गूगल काही दिवसांत इंडिया सोडून जाईल.” चौथ्या युजरने लिहिले आहे, “आई, माझ्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय आई, आई मी येतोय आई.” आणखी एक लिहितो, “हे भारी आहे, आता मित्रांमध्ये भांडण होणार नाही.” या व्हिडिओला ३० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि १० मिलियन व्ह्यूज आले आहेत.