डॉक्टर ब्रेन ट्युमर काढत होते, महिला ऑपरेशन थिएटरमध्ये पाहात होती Jr. NTR चा सिनेमा

Woman Watches Junior NTR Movie During Surgery:  सोशल मीडियावर ज्यूनिअर एनटीआरच्या फॅनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Woman Watches Junior NTR Movie During Surgery:  सोशल मीडियावर ज्यूनिअर एनटीआरच्या फॅनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही महिला तिच्या आयुष्यातील सर्वात बिकट परिस्थितीमध्ये ज्युनिअर एनटीआरचा सिनेमा पाहत आहे. आंध्र प्रदेशमील काकीनीडामधील सरकारी हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ आहे. यामध्ये डॉक्टरांची एक टीम महिला रुग्णाच्या ब्रेन ट्युमरची सर्जरी (brain surgery) करत होती. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला ऑपरेशनच्या दरम्यान साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा (Jr. NTR ) सिनेमा पाहत होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मेडिकल भाषेत याला ‘डीप ब्रेन स्टिम्यूलेशन' किंवा 'एवेक क्रॅनीओटॉमी' असं म्हणतात. यामध्ये रुग्णांना गुंतागुतीच्या प्रक्रियेच्या दरम्यान जागं आणि त्याच्या मेंदूला सक्रीय ठेवले जाते.  

( नक्की वाचा : बिहारी माफियांचं कंबरडं मोडणाऱ्या मराठी IPS अधिकाऱ्यानं दिला अचानक राजीनामा )
 

ए. अनंतलक्ष्मी  (A. Ananthalakshmi) असं या 55 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. त्यांच्या मेंदूच्या डाव्या भागात  3.3 x 2.7 सेमीचा ट्युमर होता. त्यानंतर त्यांनी त्याचा उपचार खासगी हॉस्पिटलमध्ये न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये करण्याचं ठरवलं. 

सिनेमा दाखवण्याचं कारण काय?

सर्जरीच्या दिवशी, मेडिकल टीमनं अनंतलक्ष्मी यांना शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी ज्युनिअर एनटीआरचचा अधुर्स हा सिनेमा दाखवला. तो त्यांचा आवडता सिनेमा आहे. त्यांच्या ऑपरेशनची प्रक्रिया अतिशय गुंतागुतीची तसंच अपारंपारिक होती. त्यांच्या मेंदूमधील ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. या ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.